नॅशनल कॅडेट क्रोप्सच्या वतीने वन इंडिया ग्रेट इंडिया संकल्पनेवर शिबिराचे आयोजन

पुणे, २२ सप्टेंबर २०२०: ‘नॅशनल कॅडेट क्रोप्सच्या’ (एनसीसी) वार्षिक राष्ट्रीय राशी एकात्मता शिबीराचा भाग म्हणून ‘वन इंडिया, ग्रेट इंडिया’ संकल्पनेवर आधारित ऑनलाइन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नॅशनल कॅडेट क्रोप्सच्या वतीने या ऑनलाइन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर 21 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीमध्ये घेण्यात येणार आहे. या शिबिरामध्ये महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मधील एनसीसी संचालनालयाने पुढाकार घेतला असून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश मिळून 200 कॅडेट्सनी यामध्ये भाग घेतलेला आहे.

दोन्ही राज्यांमधील संस्कृतींची देवाण-घेवाण करण्यासाठी मुख्यत: या शिबिराचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यासोबतच दोन्ही राज्यातील कॅडेट्सनी इतिहास, भूगोल,अर्थव्यवस्था, सांस्कृतिक वारसा, चालीरिती परंपरा, याही विषयांवर चर्चा करत विचारांची देवाण-घेवाण केली. शिबिराच्या पुढच्या भागात, सध्या होत असलेल्या शैक्षणिक धोरणांमधील बदल याही विषयावर या शिबिरामध्ये चर्चा आयोजित करण्यात येणार आहे.

या ऑनलाईन शिबिराच्या सुरुवातीला आज पुणे ग्रुपचे कमांडर ब्रिगेडियर सुनील लिमये आणि २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियन एनसीसीचे कर्नल विनायक चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ज्ञानेश्वरी आयवळे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा