बारामती, ४ ऑक्टोबर २०२०: श्री. काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन येथील इंडियन रेड क्रॉस सोसायटी संचलित लेट, मानिकाबाई चंदुलाल सराफ ब्लड बँक येथे करण्यात आले होते.
बारामती तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने रक्ताची कमतरता असल्याने रक्तदान शिबिरे आयोजित करून ब्लड बँकेत रक्त संकलित केले जाते. मात्र सध्या असणाऱ्या कोरोनाच्या भीतीमुळे रक्त संकलन करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे गरजू रुग्णांना रक्त पुरवठा करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभुमीवर ब्लड बँकेच्या विनंतीवरुन कसबा येथील
श्री. काशिविश्वेश्वर तरुण मंडळाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी गणेश मंडळ तसेच दहीहंडी संघातील तरुणांना रक्तदानाचे आवाहन करण्यात आल्यावर आज रावीवर दि. ४ ऑक्टोबर रोजी ३५ रक्तदात्यांनी रक्तदान केले, तर मागील दहा वर्षांपासुन जेव्हा ब्लड बँकेत रक्ताचा तूटवडा असेल तेव्हा आम्ही रक्तदान करतो असे अध्यक्ष सुरज सातव यांनी सांगितले. तर अशा रक्तदान शिबिरांमुळे आपल्याच लोकांना गरजेच्या वेळी रक्ताची मदत होते असे ब्लड बँकेचे जनसंपर्क अधिकारी सोमनाथ कवडे यांनी सांगितले.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव