पुरंदर, दि.२८ ऑगस्ट २०२० : महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत पुरंदर तालुक्यामध्ये केवळ एकच हॉस्पिटल उपलब्ध आहे. या योजनेसाठी तालुक्यातील इतर हॉस्पिटलचाही समावेश करावा त्यासाठीचे प्रस्ताव आठ दिवसांमध्ये दाखल करावेत अशा सुचना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिल्या आहेत.
आज. खा. सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत सासवड येथील पंचायत समिती सभागृहात पुरंदर तालुक्यातील कोरोना आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी , आमदार संजय जगताप. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, माजी आमदार अशोक टेकवडे,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपविभागीय अधिकारी प्रमोद गायकवाड, सासवड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक डी. एस. हाके, तहसीलदार रूपाली सरनौबत, मिलिंद टोणपे, पूनम शिंदे, विनोद जळक, मोहन गायकवाड, डॉ.प्रा. दिगंबर दुर्गाडे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सुदाम इंगळे, विराज काकडे, पुरंदर पंचायत समितीच्या सभापती नलिनी लोंळे, गौरी कुंजीर, विजय कोलते, हेमंत माहुरकर, दत्ता चव्हाण, पुष्कराज जाधव, विठ्ठल झेंडे, हरिभाऊ लोळे हे पदाधीकारी उपस्थित होते.
यावेळी पुरंदरच्या तहसीलदार रूपाली सरनौबत यांनी पुरंदरमधील कोरोनाच्या सद्यस्थिती बद्दलची माहिती उपस्थितांना दिली. तालुक्यात जे ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्यांना शुगर व बी.पी.चा आजार आहे ते रुग्ण कोणत्याही प्रकारे आजारी होता कामा नये. याची सर्व पातळीवर दखल घेऊन संबंधित रुग्णास तातडीने उपचार करण्यात यावेत. तसेच सर्वांना मास्कची सक्ती करावी. होम सर्वेवर भर द्यावा. त्याचबरोबर तालुक्यात रुग्णवाहिकेची संख्या कमी पडत असेल तर खाजगी रुग्णवाहिका सेवेत घेण्याबाबत सूचना प्रसाद यांनी प्रशासनाला दिल्या
न्यूज अनकट प्रतिनिधी: राहुल शिंदे