मुंबई : भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने मोबाइल ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.
एका ऑपरेटरच्या नेटवर्कवरून दुसऱ्या नेटवर्कवर कॉल केल्यास ६ पैसे प्रति मिनिट दर आकारले जाणार असल्याचे ट्रायने स्पष्ट केले आहे. एक वर्षापर्यंत म्हणजेच ३१ डिसेंबर २०२० पर्यंत हे शुल्क वसूल केले जाणार आहे.
ट्रायच्या म्हणण्यानुसार, वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर ६ पैसे प्रतिमिनिट टर्मिनेशन दर ३१ डिसेंबर २०२० पर्यंत आकारले जाणार आहेत.
प्रारंभी हे दर १४ पैसे प्रतिमिनिट आकारले जात, मात्र २०१७ ला ते घटवून ६ पैसे प्रतिमिनिट करण्यात आले आहे. १ जानेवारी २०२० पर्यंत हे दर बंद होणार असल्याची चर्चा आहे. ट्रायने या दर वसुलीची मुदत एका वर्षाने वाढवली आहे. वायरलेस टू वायरलेस घरगुती कॉल्सवर ६ पैसे प्रतिमिनिट दर १ जानेवारी २०२१ पर्यंत बंद होण्याची शक्यता आहेत.
याबाबत सीओएआयचे महासंचालक राजन एस. मॅथ्यू म्हणाले की, ट्रायचे हे पाऊल योग्य दिशेने पडले आहे. COAI ने दूरसंचार क्षेत्रातील गंभीर वित्तीय तणाव दूर करण्यासाठी सरकार व नियामकांसोबत असल्याचे सांगितले आहे.