भारतात रहस्यमय आजाराचा शिरकाव, ४०० जणांना बाधा, एकाचा मृत्यू …..

आंध्र प्रदेश (एलुरु), ८ डिसेंबर २०२०: जगभर कोरोनाने हाहाकार माजवला आसून, जग हे अजून ही या आजाराशी लढा देत आहे. अश्यातच भारतात एका रहस्यमय आजाराने शिरकाव केला असून याचं मुळ कारण अद्याप ही भेटलं नाही. मात्र, याची संख्या अचानक वाढली असून प्रशासन योग्य ती खबरदारी घेत आहे.

आंध्र प्रदेश च्या एलुरु कसब्यात या रहस्यमय आजारामुळं एकाचा मृत्यू झाला तर ३८० पेक्षा जास्त जणांना याची लागण झालीय. ज्यांच्यावर सरकारी दवाखान्यात उपचार चालू आहेत. या आजारामधे रूग्णांना फिट येणं, अचानक बेशुद्ध होणं, कंप सुटणं आणि तोंडातून फेस येण्याची तक्रार केली जात आहे. ज्या रूग्णाचा मृत्यू झाला त्याचावर उपचार देखील याच सरकारी रुग्णालयात चालू होते.

आंध्र प्रदेश चे मुख्यमंत्री वाईएस जगन मोहन रेड्डी यांनी एलुरु च्या सरकारी रूग्णालयाचा दौरा करत रूग्णांना भेट दिली. जिथे या आजाराचे १५० रूग्ण भर्ती असून, रेड्डी यांनी रूग्णांना त्यांच्या आरोग्या विषयी विचारणा केली व नंतर डाॅक्टरांशी हि चर्चा केली. या रूग्णांची संख्या वाढली असून ती आता ३८० पेक्षा ही जास्त झाल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. उपचारानंतर २०० रूग्णांना घरी देखील सोडण्यात आलं आहे. मंगलगिरि च्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानच्या डॉक्टरांची एका टीम नं रूग्णालयाचं निरीक्षण केलं आणि बरोबरच विस्तृत परिक्षणासाठी रूग्णांचे नमुने घेतले.

सुरवातीला डॉक्टर देखील हैराण…

एलुरु मधील रहस्यमयी आजाराची दहशत बघून डाॅक्टर देखील चकित झाले होते. वेगवेगळ्या भागात राहत असून ही लोकांमधे सारखी लक्षणं कशी असू शकतात याचा सारखा अंदाज बांधत होते. एलुरू च्या वेगवेगळ्या भागातील ४५ असे रूग्ण होते ज्यांमधे या आजाराचे विचित्र असे लक्षण बघण्यात आले आणि महत्वाचं म्हणजे हे एकमेकांच्या सहवासातील ही किंवा ओळखीचेही नव्हते. या रूग्णांमधे ४६ मुले तर ७० महिला आहेत. लहान मुलांना सोडलं तर प्रत्येक रूग्णाचं वय हे २० ते ३० मधलं आहे. या प्रकोपाची सुरवात एलुरुच्या वन टाउन क्षेत्रातून सुरू झाली आणि रविवारी एका व्यक्तिचा मृत्यू झाला. रूग्णांचे रक्ताचे नमूने घेऊन सीटी स्कॅन केले गेले, पण आत्ता पर्यंत स्वास्थ्य अधिकारी या आजाराचं मुळ कारण शोधू शकले नाहीत.

तसंच सेरेब्रल स्पाइनल फ्लूइड (डोक्याची आणि पाठीतील मनक्याच्या हडांची स्थितीचे) निरीक्षण केलं जे समान्य मिळालं. कल्चर टेस्ट (शरीरातील जंतूची माहिती) रिपोर्ट आल्या नंतरच काय ते कारण कळू शकंल. तसेच के (आतड्या मधील जंतू) रिपोर्ट ची वाट बघितली जात आहे.

रिपोर्ट आल्यावरच नेमकं कारण कळू शकंल…..

स्थानीय स्वास्थ्य अधिकाऱ्यांचं म्हणनं आहे की, विजयवाड़ा आणि विशाखापट्टनम च्या लॅब मधे पाठवलेले रूग्णांचे सेरेब्रल-स्पाइनल फ्लूएड सैंपल चे रिपोर्ट आल्या नंतरच खुलासा होऊ शकंल. हेल्थ एक्सपर्ट सध्या वेगवेगळ्या बाजूंनी तपास करतायत जसं वायु प्रदूषण, दूषित दूध किंवा विषारी केमिकल चे निरीक्षण ते करत आहे. तर काही लोकांचं मत सामूहिक उन्माद आसल्याचे आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा