सोलापूर, २७ ऑक्टोबर २०२२: सोलापूर जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस दर देणाऱ्या श्री सुधाकरपंत पांडुरंग साखर कारखान्याला ऊस वाहतूक करणारा टॅ्क्टरवर हल्ला करण्यात आला आहे. या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आंदोलकांनी धारधार सुरा वापरुन येणाऱ्या गाड्याचे बारा टायर फोडले आहेत.
वाखरी तालुका पंढरपुर येथील थोरात पेट्रोलपंपाच्या समोर ही घटना घडली आहे. ऊसदर संघर्ष समितीमध्ये गुन्हेगारी वृत्तीचे काहीजण शिरल्यामुळे शेतकरी संघटनांच्या आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता होतीच आणि तसेच घडले आहे. यामुळे वाहन मालकाचे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
या आंदोलनातून गुन्हेगारी वृत्तीचे लोक पुढे येत आहेत का? असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. येणाऱ्या काळात शेतकरी संघटनांना याची उत्तरे द्यावी लागणार आहेत. तसेच या हिंसक आंदोलनाची जबाबदारी स्वीकारवी लागणार असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर