पुणे-मुंबईत रात्रभर पावसाचे तांडव… रस्ते जलमय

पुणे, १५ ऑक्टोंबर २०२०: काल हैदराबाद शहरातील रस्त्यांवरून बोटी फिरत होत्या तर आज मुंबई आणि पुणे शहर जलमय झाले आहे. मुंबई आणि पुण्यात रात्री मुसळधार पाऊस पडला. मुंबईतील सायन पोलिस ठाण्याजवळ अनेक फूट पाणी भरले आहे. तर दुसरीकडे पुण्यातील रस्त्यांवरून नदी वाहण्यासारखे प्रसंग तयार झाले होते. पुण्याच्या दगडूशेठ गणेश मंडळाच्या बाहेर अनेक फुट पाणी साचले आहे.

रात्री उशिरापर्यंत मुंबईत पाऊस

आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान खात्याने आज मुंबईसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. रात्रीच्या पावसानंतर मुंबईत भायखळा, हिंदमाता, कुर्ला, किंग सर्कलसह अनेक भागात पाणी साठले आहे.

पुण्यात मुसळधार पावसानंतर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुण्यातील इंद्रपूर भागात मुसळधार पाऊस पडल्यानंतर नदी नाल्यांना ऊफान आले होते. त्यामुळे या भागातील दुचाकी स्वार पाण्याच्या प्रवाहात वाहू लागला होता. यानंतर जेसीबीच्या मदतीने बरीच मेहनत घेतल्यानंतर त्याला वाचवण्यात आलं.

दगडू शेठ गणेश मंडळाबाहेर रस्ता जलमय

काल झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाच्या समोरचा रस्ता काही फूट पाण्याखाली गेला होता. मुसळधार पावसानंतर पुणे-अहमदाबाद महामार्गावरही पूर आला आहे.

अतिवृष्टीचा इशारा

हवामान खात्याने पुण्यासह महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात पावसाचा इशारा दिला आहे. कालपासून मुंबईत पाऊस सुरू आहे. पुण्यात मुसळधार पावसामुळे पुणे-सोलापूर महामार्गावर वाहतूक विस्कळीत झाली आणि इथल्या रस्त्यावर पाणी वाहू लागले. पुण्यात अनेक ठिकाणी लोकांच्या घरातही पावसाचे पाणी शिरले.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा