फेक टीआरपी प्रकरणात दोन न्यूजचैनलचे मालक गजाआड, रिपब्लिक टीव्हीवर देखील कारवाई

मुंबई, ९ ऑक्टोंबर २०२०: मुंबई पोलिसांनी गुरुवारी रात्री टीव्ही चॅनेलच्या टीआरपी बाबत मोठा खुलासा केला. मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी स्पष्ट केलं की, रिपब्लिक न्यूज चैनल पैसे देऊन आपली टीआरपी वाढवत आहे. ते म्हणाले की, चैनल ची टीआरपी वाढवण्यासाठी रिपब्लिक टीव्ही लोकांना पैसे देत होता. टीआरपी वाढवण्यासाठी रिपब्लिक टीव्ही सातत्यानं धडपड करत होता.

मुंबई पोलीस आयुक्तांनी असा दावा केला की, जी लोकं अशिक्षित आहे व ज्यांना इंग्रजी भाषेचे ज्ञान नाही ही आता घरांमध्ये देखील इंग्रजी माध्यमातील चॅनल सुरू ठेवले जात होते इतकेच काय तर ज्या घरांमध्ये कोणीच राहत नसत त्या घरांमध्ये देखील टीव्ही सुरू ठेवून हे चॅनल सुरू ठेवले जात असत. ज्या घरात टीआरपी मीटर बसविण्यात आले आहेत, त्यांना फक्त एकच चॅनेल पाहण्यास पैसे देण्यात आले.

पोलिस आयुक्तांनी सांगितलं की, दोन मराठी वाहिन्या बॉक्स सिनेमा व फक्त मराठी या वाहिन्यांच्या मालकांना ही अटक करण्यात आलीय. यासह रिपब्लिक टीव्हीची खाती देखील जप्त केली जाऊ शकतात. परमबीर सिंह म्हणाले की, टीआरपी वाढवण्याचा हा खेळ जास्तीत जास्त जाहिराती मिळवण्यासाठी खेळला जात होता.

मुंबई पोलिसांचा असा दावा आहे की, हंसा कंपनीचे पूर्वीचे कर्मचारी या धंद्यात गुंतले होते. याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचार्‍यासह दोन जणांना अटक करण्यात आलीय. एका व्यक्तीच्या खात्यातून २० लाख रुपये जप्त केले आहेत. तर त्याच्या बँक लॉकरकडून ८.५ लाख रुपये मिळाले आहेत.

परमबीर सिंह पुढे म्हणाले की, तक्रारीच्या आधारे आम्ही फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे. रिपब्लिक टीव्हीचं नावही समोर आलं आहे. ज्या ग्राहकांशी संपर्क साधला होता त्यांनी कबूल केलं आहे की रिपब्लिक चॅनल चालू ठेवण्यासाठी त्यांना पैसे देण्यात आले. त्यांनी त्यांची निवेदनं नोंदविली आहेत. रिपब्लिक टीव्हीवरही बार्क’नं शंका उपस्थित केली आहे.

रिपब्लिक टीव्हीचे प्रमोटरही या घोटाळ्यात सामील असू शकतात, असं मुंबई पोलिसांचं म्हणणं आहे. याप्रकरणी चौकशी सुरू आहे. या वाहिन्यांवर चालणार्‍या सर्व जाहिरातींचीही चौकशी केली जाईल. जाहिरातदारांना देखील विचारलं जाणार आहे की या बाबतीत त्यांना फसवण्यात आलं आहे की ते स्वतःच्या काळ्या धंद्यात सहभागी होते.

मुंबई पोलिसांच्या म्हणण्यानुसार सुमारे २००० घरांमध्ये ही फसवणूक चालू होती आणि प्रत्येक घराला ४०० ते ५०० रुपयांपर्यंत पैसे दिले जात होते. पोलिस आयुक्तांनी सांगितलं की, जर हा प्रकार मुंबईत होत होता तर तो देशातील इतर भागात देखील होत असण्याची शक्यता टाळता येत नाही. यात काही विद्यमान कर्मचारी आणि काही आतील लोकांचा देखील समावेश आहे. बीएआरसी अधिकाऱ्यांची ही चौकशी केली गेली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही बोलावलं जाईल.

मुंबई पोलिस आयुक्तांनी सांगितलं की, आज रिपब्लिक टीव्ही अधिकाऱ्यांना समन्स पाठविण्यात येणार असून त्यांना चौकशी पथकासमोर हजर राहण्यास सांगितलं जाईल. त्यांनी सांगितलं की हंसा ही एजन्सी आहे जीनं मुंबई पोलिसात तक्रार दाखल केली. आम्ही या प्रकरणाशी संबंधित सर्व खात्यांची चौकशी करू. फॉरेन्सिक तज्ञांची मदत घेतली जात आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा