पुणे, १० ऑक्टोबर २०२०: पुणे महापालिकेच्या ‘लायगुडे हॉस्पिटल’मध्ये एकूण ५० ऑक्सिजन बेड्स सुरू करण्याचे काम सुरू आहे. त्यापैकी काही बेड सुरू झाले आहेत. आज महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते या नव्या वैद्यकीय यंत्रणेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी आ. श्री. भीमराव तापकीर त्यांच्या समवेत होते.
लायगुडे हॉस्पिटलमध्ये सोमवारपर्यंत ३० ऑक्सिजन बेड्स सुरू होणार आहेत, तर उर्वरीत २० बेड्स पुढील एका आठवड्यात तयार होतील.लायगुडे हॉस्पिटलचे खाजगीकरण ही केवळ अफवा आहे. आपल्या महापालिकेच्या माध्यमातून ‘लायगुडे हॉस्पिटल’मध्ये नागरिकांसाठी चांगल्या सुविधा देण्यात येत आहेत. तरी नागरिकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये.
कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाच्या सुरवातीच्या काळात आपल्या महानगरपालिकेने खबरदारी म्हणून ठिकठिकाणी कोविड केअर सेंटर उभारण्यात आले होते. परंतु कोरोनाची सद्यस्थिती पाहता उपचार घेणाऱ्या एकूण रुग्णांपैकी होम आयसोलेशन रुग्णांची संख्या जास्त असल्यामुळे कोविड केअर सेंटर कमी करण्यात आले असून आता ऑक्सिजन आयसीयू बेड्स उपलब्ध करून देणे, हे आव्हान महापालिकेपुढे आहे.
यावेळी नगसेवक हरिदास चरवड, राजाभाऊ लायगुडे, शंकर पवार, आनंद रिठे,राजश्री नवले, नीता दांगट, अश्विनी पोकळे, तसेच बाळासाहेब नवले, सचिन मोरे, आरोग्य प्रमुख डॉ. भारती, डॉ. वैशाली साबणे, श्रीनिवास कंदुल आदीही उपस्थित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी : ज्ञानेश्वरी आयवळे