बारामती, दि.१२ मे २०२०: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी यांच्यावर असणाऱ्या ताणतणाव असतो. यामुळे मागे काही दुर्दैवी घटना देखील घडल्या आहेत. त्यामुळे आज बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या ऑक्सिजन व पल्सरेटची आज (मंगळवारी) तपासणी करण्यात आली.
बारामती शहर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना नेहमीच कामाचा ताण असतो. त्यामुळे अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्याच्या घटना घडल्या आहेत. आज बारामती शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना डॉ सुजित अडसूळ, डॉ वृषाली अडसूळ यांनी समुपदेशन केले यावेळी उपविभागीय अधिकारी नारायण शिरगावकर व पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी पोलीस कर्मचारी यांच्याशी चर्चा करुन असणारा नोकरीचा ताणतणाव तसेच कौटुंबिक किंवा अन्य काही तणाव असेल तर याबाबत आपल्या वरिष्ठांशी चर्चा करावी किंवा आपल्या सहकाऱ्यांशी मनमोकळे बोलावे या काळात आपली काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी ऑक्सिगार्ड प्रमाणे अधिकारी व शिपाई यांचे रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण तसेच पल्सरेट तपासण्यात आले. यावेळी सर्व पोलीस अधिकारी कर्मचारी यांची तपासणी केल्यावर ते उत्तम असल्याचे पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी सांगितले. सर्वांमध्ये सरासरी ऑक्सिजन ९८ टक्के तर पल्सरेट ६९ ते १०४ टक्क्यांपर्यंत आहे.
आपण सर्व एकत्र टीममध्ये काम करत असताना संघनायक म्हणून आपण सगळे सवंगडी एकत्र आहोत, या प्रमाणे वागले पाहिजे
औदुंबर पाटील, पोलीस निरीक्षक
न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल यादव