नवी दिल्ली, ६ सप्टेंबर २०२०: संपूर्ण देशभरात कोरोनाने थैमान घातलं आहे. भारतात कोरोना रुग्णांची संख्या काही आटोक्यात येताना दिसत नाही. दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. भारत कोरोनाच्या बाबतीत नवनवीन विक्रम मोडत आहे. देशाने अवघ्या दोन दिवसांत ८० हजारांचा टप्पा पार केला आहे. याच मुद्द्यावरून माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न विचारला आहे.
न्यूझीलंड देश हा सर्वप्रथम कोरोना मुक्त होणारा देश बनला. त्यानंतर इतर देशांनी ही कोरोनावर यशस्वीरीत्या मात दिली. यावरून पी. चिदंबरम् म्हणाले, ” इतर देश जर कोरोनावर नियंत्रण मिळवू शकले आहेत तर भारताला अजून कोरोनावर यश मिळवणं का शक्य झालं नाही”?
तसेच भारत हा एकमेव देश आहे ज्या देशाला लॉकडाऊनच्या रणनीतीचा फायदा उचलता येत नाहीये. पंतप्रधान मोदी यांनी आधी सांगितले होते ही २१ दिवसांत कोरोनावर मात करू. इतर देश यामध्ये यशस्वी झाले आहेत. पण भारताला यश मिळालेलं नाहीये.
मी सांगितल्याप्रमाणे ३० सप्टेंबरपर्यंत कोरोना रूग्णांची संख्या ५५ लाखांपर्यंत पोहोचेल. परंतु मी चुकीचा ठरणार आहे. कारण २० सप्टेंबरपर्यंतच भारत ही संख्या गाठणार आहे. तर सप्टेंबर अखेरपर्यंत कोरोनाचे रूग्ण ६५ लाखांचा आकडाही पार करतील. असं चिदंबरम यांनी सांगितलंय.
न्यूज अनकट प्रतिनिधी: अंकुश ढावरे