पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली: आयएनएक्स मीडिया गैरव्यवहार प्रकरणी माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे
२ लाखांच्या जात मुचलक्यावर चिदंबरम यांना जामीन अर्ज मंजूर करण्यात आला आहे. चिदंबरम यांना चौकशीत सहकार्य आणि न्यायालयाच्या परवानगीशिवाय देश सोडून न जाण्याच्या अटीवर त्यांना जामीन देण्यात आला आहे. चिदंबरम हे १०६ दिवस तिहार तुरुंगात होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा