बर्मिंगहॅम, ८ ऑगस्ट २०२२: कॉमनवेल्थ गेम्स २०२२ स्पर्धेचा आज शेवटचा दिवस होता. भारतासाठी आजची सुरुवातच सोनेरी झाली. बॅडमिंटन महिला एकेरीची फायनलमध्ये पी.व्ही. सिंधूने कॅनडाच्या मिशेल ली वर विजय मिळवला. या विजयासह सिंधुने कॉमनवेल्थ मध्ये पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले. बर्मिंघम कॉमनवेल्थ गेम्स मधील भारताचं हे १९ व गोल्ड मेडल आहे. कॉमनवेल्थ गेम्स मध्ये पहिल्यांदाच सिंधुने सुवर्णपदक विजेती कामगिरी केली आहे.
पी.व्ही. सिंधुने आजच्या सामन्यात प्रतिस्पर्धी मिशेल ली हिला प्रतिवार करण्याची संधीच दिली नाही. तिने स्ट्रेट गेम मध्ये विजय मिळवला. सिंधुने पहिला गेम २१-१५ असा जिंकला. दुसऱ्या गेम मध्ये २१-१३ असा विजय मिळवला. कॉमनवेल्थ गेम्स २०२२ मध्ये बॅडमिंटनमधील भारताचं हे पहिलं सुवर्णपदक आहे.
भारताच्या बॅडमिंटन संघाने आधीच तीन मेडल्स जिंकले आहेत. मिश्र दुहेरीत रौप्य पदक मिळवलं आहे. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणाऱ्या सिंधुला अजून कॉमनवेल्थ मध्ये गोल्ड मिळवता आलं नव्हतं. २९१८ सालच्या गोल्ड कोस्ट कॉमनवेल्थ गेम्स मध्ये अंतिम फेरीत तिचा पराभव झाला होता. आज सुवर्णपदक जिंकण्याच्या इराद्याने ती मैदानात उतरली होती. जे ठरवलं ते तिने करुन दाखवलं. हेच सिंधूच्या आजच्या खेळातून दिसलं आणि तिने सुवर्ण पदक जिंकले.
HATS OFF P.V. SINDHU
न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस