पदासाठी तीस वर्षांची “मैत्री” संपली

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत सत्ता स्थापनेवरुन भाजप व शिवसेनेची असलेली ३० वर्षांपासूनची युती यंदाच्या निवडणुकीतून संपुष्टात आल्याचे पहायला मिळाले. कारण अरविंद सावंत यांनी केंद्रातील मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे शिवसेना आपल्या मित्राशी असलेली ३० वर्षांची मैत्री तुटली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रथम शिवसेनेने १९८९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी भाजपशी युती केली होती.तेव्हा प्रमोद महाजन हे या युतीचे शिल्पकार होते. भाजप-सेना युती ३० वर्षांनंतर संपुष्टात आली आहे. कारण भाजपनं सेनेला ५०-५० टक्के पदे देताना मुख्यमंत्रीपद नाकारले. केंद्रात १९९८ – ९९ मध्ये वाजपेयी यांच्या सरकारमध्ये शिवसेना होती.
कालपर्यंत अकाली दल व शिवसेना हे दोनच पक्ष कायम भाजपसोबत राहिले. परंतु शिवसेनेने मुख्यमंत्रीपदासाठी युती तोडली आहे. इतर पक्ष नेहमी भाजपप्रणीत एनडीएतून आत-बाहेर होत राहिले आहेत. परंतु शिवसेनेने ३० वर्षात कधीच भाजपची साथ सोडली नव्हती. आज शिवसेनेचे केंद्रात २१ सदस्य आहेत. लोकसभा १८ तर राज्यसभा ३ सदस्य शिवसेनेच्या या निर्णयाने भाजपच्या सरकारातून बाहेर पडले आहेत. परंतु यामुळे भविष्यात भाजपला राजकीय तोटा भासण्याची शक्यता आहे.

अरविंद सावंतांनी दिला केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिल्याने भाजप व शिवसेना यांच्यातील युती मोडीत निघाली आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी घडत असल्याचे नमूद करून सावंत म्हणाले की, विधानसभा निवडणुकीपूर्वी सत्तेचे समान वाटप, या मुद्यावर चर्चा झाली होती. परंतु भाजप नेते आता समान पद वाटप नाकारत आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनाच खोटे ठरवण्याचा प्रयत्न आज भाजप करत आहे.
शिवसैनिक म्हणून माझ्यासाठी हे अत्यंत वेदनादायी गोष्ट आहे. असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच अरविंद सावंत यांनी मला केंद्रात मंत्री राहणे नैतिकदृष्ट्या योग्य नसल्याने मी पदाचा राजीनामा दिला आहे. रामजन्म भूमीच्या मुद्यावर भाजप-सेना एकत्र आले होते. राज्यात १९९५ साली युतीचे प्रथम सरकारही स्थापन झालं होते.

– प्रशांत श्रीमंदिलकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा