पाकिस्तान आणि चीनची होणार भेट

पुणे, १७ ऑगस्ट २०२२ : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती सुधारण्याच्या उद्देशाने पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ हे लवकरच चीनचे पंतप्रधान झी जिनपिंग यांची पुढच्या महिन्यात भेट घेणार असल्याचं वृत्त नुकतचं हाती आलंय. शांघाय आणि उझबेकिस्तान यांच्या बैठकीत ही भेट होणार आहे. या बैठकीत चीनबरोबर, रशिया, भारत, उझबेकिस्तान, कझाकिस्तान, हे देश सामील होणार आहेत. १५ आणि १६ सप्टेंबरला ही बैठक होणार असून स्वत: झिनपिंग या बैठकीत सामील होणार की नाही, याची खात्रीशीर बातमी अजून मिळालेली नाही.

कदाचित कोविडच्या पार्श्वभूमीवर ही समेट ऑनलाईन होण्याची दाट शक्यता आहे. पाकिस्तान यावेळी कदाचित रशियाशीदेखील चर्चा करेल, असेही सूत्रांनी सांगितले.
सध्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती बिकट आहे. श्रीलंकेप्रमाणे पाकिस्तानलाही मदतीची गरज आहे. त्यामुळे पाकिस्तानसाठी ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे. या बैठकीतून पाकिस्तानला स्वत:ची भूमिका मांडण्यासाठी चांगली संधी मिळणार आहे. त्यामुळे पाकिस्तानला मदत आणि अस्तित्व दोन्ही मिळवण्यासाठी ही बैठक नक्कीच उपयोगी ठरेल. आता शाहबाज शरीफ काय पद्धतीने आपले प्रश्न आणि विचार मांडतात आणि चीन काय भूमिका घेईल, हे १६ सप्टेंबरला ठरेल.

न्यूज अनकट प्रतिनिधी- तृप्ती पारसनीस

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा