दुबई २४ फेब्रुवारी २०२५ : भारतीय संघाचा रन मशीन आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याच्या फॉर्मला वाव देत कालच्या पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात नाबाद १११ चेंडूत १०० धावांची शानदार खेळी खेळली. त्याच्या शानदार खेळीच्या जोरावर टीम इंडियाने चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानवर ६ गडी राखून विजय मिळवला आहे. या दुसऱ्या विजयासह भारतीय संघाने उपांत्य फेरीत आपले स्थान जवळपास निश्चित केलं असून पाकिस्तानचा संघ स्पर्धेतून बाहेर जाण्याच्या मार्गावर आहे.दरम्यान, या सामन्यावेळी पाकिस्तानमधील काही क्रिकेट चाहते भारतीय संघाचे समर्थन करताना दिसले. भारत पाकिस्तान सामना पाहण्यासाठी चाहते आतुरतेने वाट पाहत असतात. मात्र कालच्या सामन्यात काही चाहते आपल्या संघाऐवजी थेट प्रतिस्पर्धी संघाला पाठिंबा देतान दिसले. त्यामुळे कर्णधार मोहम्मद रिजवानच्या संघाच खच्चीकरण झाल आहे.
सामन्या दरम्यान भारतीय संघाला पाठिंबा देणाऱ्या एका चाहत्याने एनआयशी बोलताना सांगितल की, आमचा पाकिस्तान संघ भारतीय संघाच्या बरोबरीचा नाही. त्यामुळे आम्ही टीम इंडियाल पाठिंबा देत आहोत. हा चाहता कालच्या सामन्यात भारतीय संघाची जर्सी घालून आला होता. तो पुढे म्हणाला. ” आमच्या संघातील खेळाडूंकडे ना फिटनेस आहे, ना चांगले कौशल्य आहे. आम्ही भारतीय संघाला पाठिंबा देत आहोत कारण त्यांच्याकडे चांगले कौशल्य आहे.”आमचा संघ त्यांना पराभूत करू शकत नाही.आम्हाला चांगले माहीत होते की गेल्या वर्षभरपासून विराट कोहली फॉर्मशी झगडतोय तो पाकिस्तानवृद्धच्या सामन्यात फॉर्ममध्ये परत येईल आणि शतक झळकावेल. नेमकं तसंच झालं.
दुबई येथील आंतराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या सामन्यात पाकिस्तान संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.भारतीय संघाने प्रतिस्पर्धी पाकिस्तान संघाला २४१ धावांवर रोखले. या धावांचा पाठलाग करत असताना टीम इंडियाने ही धावसंख्या ४२.३ षटकांत पूर्ण केली. भारताला कर्णधार रोहित शर्मा आणि शूबनम गिल या सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली. रोहितने १५ चेंडूत २० धावा तर शूबनमने ५२ चेंडूत ४६ धावा केल्या. पुढे दोन्ही सलामीवीर बाद झाल्यावर श्रेयस अय्यर आणि विराट कोहलीने भारताचा डाव सावरला. विराट कोहलीने १११ चेंडूत १०० धावांची शानदर नाबाद शानदार खेळी केली तर श्रेयस अय्यरने ६७ चेंडूत ५६ धावा करत शानदार अर्धशतक ठोकले.
न्यूज अनकट प्रतिनिधी, प्रथमेश पाटणकर