पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून नुकसान भरपाईची मागणी, श्रीलंकेतील सामन्यांबाबत व्यक्त केली नाराजी

6

दिल्ली, ८ सप्टेंबर २०२३ : पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला (PCB) आशिया चषक २०२३ चे आयोजन करण्याची संधी मिळाली. यावेळी सर्व सामने पाकिस्तान आणि श्रीलंकेत होत आहेत. यंदा आशिया चषक फक्त पाकिस्तानात होणार होता, पण बीसीसीआयच्या सचिवांनी नकार दिल्याने काही सामने श्रीलंकेत आयोजित करण्यात आले. या स्पर्धेतील एकूण १३ सामने श्रीलंकेत आणि ९ पाकिस्तानात होणार आहेत. या स्पर्धेच्या यजमानपदाचे अधिकार केवळ पीसीबीकडे आहेत. अशा परिस्थितीत पीसीबीने एसीसीसमोर पैशांची मागणी केल्याची बातमी येत आहे.

वास्तविक, पावसामुळे पीसीबीचे अध्यक्ष अश्रफ यांनी एसीसीला पत्र लिहिले आहे. अश्रफ यांनी हे पत्र एसीसी प्रमुख जय शाह यांना लिहिले आहे. या पत्रात त्यांनी शाह यांच्याकडून नुकसान भरपाईची मागणी केली असून श्रीलंकेतील सामन्यांचे वेळापत्रक निश्चित करण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. श्रीलंकेत होणाऱ्या सामन्यांमुळे मानधन गमावल्याबद्दल पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने एसीसीकडे भरपाई मागितली आहे. या वृत्ताबाबत पीसीबीकडून अद्याप कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही. श्रीलंकेत झालेल्या पावसामुळे पीसीबीला मोठे नुकसान सहन करावे लागले आहे.

एसीसी बोर्डाच्या सदस्यांना विश्वासात न घेता सामन्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय कसा घेतला गेला, याला जबाबदार कोण? असा सवाल पीसीबी प्रमुख झका अश्रफ यांनी केला. पत्रात नमूद करण्यात आले आहे की, ५ सप्टेंबर रोजी झालेल्या बैठकीत यजमान देश आणि एसीसी सदस्यांनी हंबनटोटा येथे स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर लगेचच श्रीलंकेचे मुख्य क्युरेटर खेळपट्टी तयार करण्यासाठी तेथून रवाना झाले होते.

हंबनटोटा येथे प्रसारणासाठी आवश्यक ती सर्व व्यवस्थाही करण्यात आली होती. एसीसीने पीसीबीला ईमेलद्वारे याची पुष्टी केली होती, परंतु काही वेळानंतर पीसीबीला मेलकडे दुर्लक्ष करण्यास सांगण्यात आले. नंतर हा सामना जुन्या वेळापत्रकानुसार होणार असल्याचे जाहीर करण्यात आले.

न्यूज अनकट प्रतिनिधी : सूरज गायकवाड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा