लाहोर, १८ ऑगस्ट २०२१: पाकिस्तानमधील भारताच्या गौरवशाली भूतकाळाशी संबंधित प्रतिकांचा सतत द्वेष केला जात आहे. तेहरीक-ए-लबाइक पाकिस्तानशी संबंधित व्यक्तीने लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा तोडला आहे. पुतळा तोडल्याची घटना सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. व्हिडिओमध्ये पाकिस्तानी कट्टरपंथी व्यक्ती महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा पाडताना दिसत आहे. पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण मंत्री फवाद चौधरी यांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली आहे.
फवाद चौधरी यांनी या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे आणि असे म्हटले आहे की, निरक्षरांचा हा समूह खरोखरच जगातील पाकिस्तानच्या प्रतिमेसाठी धोकादायक आहे. लाहोर किल्ल्यात स्थापित १९ व्या शतकातील शीख शासक महाराजा रणजीत सिंग यांचा पुतळा उखडण्याचा एक पाकिस्तानी माणूस सतत प्रयत्न करतो, मग तो पुतळा पाडतो. या दरम्यान, ती व्यक्ती रणजीत सिंग यांच्या विरोधात घोषणा देखील देत आहे.
पुतळा पाडल्यानंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचे विशेष सहाय्यक डॉ. शाहबाज गिल यांनी म्हंटले की, ही आजारी मानसिकतेची लक्षणे आहेत. अशा आरोपींवर पोलीस कडक कारवाई करतील.
अल्पसंख्याक समुदायाबद्दल आदराची कमतरता: MEA
लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांचा पुतळा पाडण्याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, आज मी लाहोरमधील महाराजा रणजीत सिंह यांच्या पुतळ्याची तोडफोड केल्याबद्दल प्रसारमाध्यमांमध्ये त्रासदायक बातम्या पाहिल्या आहेत. २०१९ मध्ये पुतळ्याचे अनावरण झाल्यापासून पुतळ्याची तोडफोड होण्याची ही तिसरी घटना आहे.
ते म्हणाले की, पाकिस्तानातील अल्पसंख्यांक समुदायांच्या सांस्कृतिक वारशावर होणारे असे हल्ले पाकिस्तानी समाजातील वाढत्या असहिष्णुता आणि अल्पसंख्यांक समुदायाबद्दल आदर नसल्याचे स्पष्ट करतात.
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे