पाकचे विमान मलेशियाकडून जप्त

पाकिस्तान, १ जून २०२३: पाकिस्तानची सरकारी नागरी उड्डाण कंपणी पाकिस्तान एअरलाईन्सचे बोईग-७७७ विमान मलेशियन सरकारने जप्त केल्याने पाकिस्तानवर नामुष्की ओढवली आहे. विमान सील करण्याचा आदेश क्वालालंपूर भष्टाचार विरोधी कोर्टाने दिला होता. पीआयने हे विमान भाडेतत्त्वावर घेतले होते, मात्र संबंधित कंपनीने १६ महिन्यांपासून पैसे जमा केले नव्हते. २०२० मध्ये अशाच प्रकारे पीआयएचे विमान जप्त केले होते.

पीआयएचे प्रवक्ते अब्दुल्लाह हाफिज यांनी विमान जप्त केल्याची कबुली दिली आहे. ते म्हणाले ही घटना घडली असून त्यावेळी विमानात १०० पेक्षा अधिक प्रवासी होते. प्रवाशांना परत आणण्यासाठी दुसरे विमान पाठवले आहे. या प्रकरणी काही गैरसमज झाले असून आम्ही विमानाचे भाडे देण्यासाठी संबंधित कंपणीशी चर्चा करण्याचा प्रयत्न करत आहोत. मात्र त्यांच्याशी संपर्क झालेला नाही. कायदेतज्ज्ञांचे एक पथक क्वालालंपूरला पाठवले असून हे प्रकरण लवकरात लवकर निकाली लागेल.

२०२० मध्ये युरोपियनमधील २८ देशांनी पाकिस्तानच्या सर्वच एअरलाईन्सवर बंदी घातली होती. पाकिस्तानचे बहुतांश वैमानिकांकडे बनावट लायसन्स आणि पदव्या असल्याचे आम्ही कशी रिक्स घेणार असल्याचे पाकिस्तानचे विमान उड्डाण मंत्री यांनी संसदेत सांगितले होते, असे युरोपियन युनियनने सांगितले होते. या प्रकरणी पाकिस्तान सरकारने खेद व्यक्त केला होता.

न्युज अनकट प्रतिनिधी: अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा