काश्मीरसाठी पाकिस्तान ने आवाज उठवला पाहिजे: शाहिद आफ्रिदी

इस्लामाबाद, ३१ डिसेंबर २०२०: पाकिस्तानचा माजी कर्णधार आणि स्टार क्रिकेटर शाहिद आफ्रिदीनं पुन्हा एकदा भारताबद्दल भडक वक्तव्य केले आहे. पीओके केपीएल (काश्मीर प्रीमियर लीग) मध्ये खेळणार आहे. केपीएलसाठी जे काही शक्य होईल ते करेन असे आफ्रिदीनं अलीकडेच सांगितलं आहे. पण, त्यासाठी त्यांनी अट ठेवली आहे. पीओकेमध्ये क्रिकेट अकादमी सुरू व्हावी अशी आफ्रिदीची इच्छा आहे. क्रिकेट अकादमीबद्दल बोलतानाही आफ्रिदीनं आपला राजकीय हेतू मागं घेतला नाही आणि पुन्हा एकदा काश्मीरवरुन भारतावर निशाणा साधला.

आफ्रिदीला पीओके मध्ये क्रिकेट अकादमी सुरू करायची आहे……

‘द नेशन’ च्या अहवालानुसार शाहिद आफ्रिदी म्हणाले की, केपीएलचा भाग झाल्यानं मला खूप आनंद होईल आणि या मदतीमुळे त्याला पुन्हा एकदा पीओकेमध्ये खेळात परत जायचं आहे, पण यासाठी त्याची फक्त एकच अट आहे. आफ्रिदी म्हणाला, ‘केपीएलसाठी मी सर्वकाही करण्यास तयार आहे. केपीएलच्या प्रत्येक फ्रेंचायझीसाठी मी खेळावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.

काश्मीरमध्ये क्रिकेट अकादमी सुरू व्हावी अशी माझी एकच अट आहे. प्रत्येकानं केपीएलला पाठिंबा द्यावा अशी माझी इच्छा आहे. ”आफ्रिदी म्हणाला या लीगचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर झाल्यानं मला खूप आनंद झाला आहे आणि त्याचबरोबर मला आशा आहे की, त्याच्या फाऊंडेशनच्या मदतीने आपली क्रिकेट अकादमी उघडल्यास काश्मीरमधील मुलांना आणि प्रतिभावानांना मदत म्हणून खेळाडूंना पुढे आणता येईल.

केपीएलचे अध्यक्ष आरिफ मलिक म्हणाले की, ‘हजारो खेळाडू केपीएलसाठी चाचण्या देतील. केपीएलच्या मदतीनं खेळाडूंना घरातील संघात आणि नंतर पीएसएलमध्ये खेळण्याची संधी मिळेल. केपीएलसाठी निधी संकलनही केलं जाईल.

पाकिस्तानने भारताविरोधात आवाज उठविला पाहिजे……

आफ्रिदीनं पुन्हा एकदा भारतावर निशाणा साधला आणि म्हटला, काश्मीरमध्ये भारताच्या भागात बरेच अत्याचार होत आहेत, त्यासाठी पाकिस्तानने आवाज उठवायला हवा. आफ्रिदी म्हणाला, ‘काश्मीरमधील छळाच्या सर्व मर्यादा भारतानं ओलांडल्या आहेत. जगात कोणताही अन्याय होत असेल तर त्यासाठी आपण आवाज उठविला पाहिजे. काश्मीर मुक्त होईल अशी वेळ नक्कीच येईल. काश्मीरसाठी सतत आवाज उठवण्याची जबाबदारी आपल्या देशात राज्य करणार्‍यांची आहे.

तर या आधी पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शोयब अख्तरनं भारतावर निशाणा साधत काश्मीर मुद्द्यावरच भारताला डिवचलं होतं. तर ऑस्ट्रेलिया-भारत संघात झालेला दुसऱ्या कसोटीत भारतला मिळालेल्या विजयाबद्दल संघाचं भरभरून कौतुक केलं होतं.

न्यूज अनकट प्रतिनिधी: निखिल जाधव

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा