पाकिस्तान विमान अपघातात ९७ जणांचा मृत्यू, केवळ २ जण वाचले

पाकिस्तान, दि. २४ मे २०२० : शुक्रवारी पाकिस्तानमध्ये विमान अपघातात ९७ जणांचा मृत्यू झाला. त्याचवेळी या विमानातील २ प्रवासी ही वाचले. यातील एक प्रवासी अभियंता मोहम्मद जुबैरने या घटनेबाबत माध्यमांशी बोलताना सांगितले की , त्याच्या समवेत या अपघातात बँक ऑफ पंजाबचे मॅनेजर जफर मसूद यांनाही वाचविण्यात आले. पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे विमान (एअरबस ए ३२०) लाहोरहून कराचीला येत होते. कराचीमध्ये लँडिंग दरम्यान विमानाचा अपघात झाला आणि अपघात होताना ते रहिवाशी भागात कोसळले.

जफर मसूद यांच्या संदर्भात बँक ऑफ पंजाबने सांगितले की, त्यांना काही ठिकाणी फ्रॅक्चर झाले आहेत, परंतु ते ठीक आहेत आणि त्यांची परिस्थिती सुधारत आहे. त्याचवेळी, दुसरे सुरक्षित अभियंता मोहम्मद जुबैर यांनी जिओ न्यूजशी बोलताना सांगितले की, प्रथम लँडिंगच्या प्रयत्नांनंतर पायलटने १० मिनिटांनी पुन्हा लँडिंगचा प्रयत्न केला आणि यानंतर विमान कोसळले.

जुबैर याला सिव्हिल हॉस्पिटल कराचीमध्ये दाखल केले आहे. तो म्हणाला- ‘मला सर्वत्र फक्त धूर आणि आग दिसत होती. मला सर्व बाजूंनी आरडाओरडा ऐकू येत होता. सर्व बाजूंनी प्रौढांचे आणि मुलांचे आवाज एेकू येत होते. पण मी त्यांना पाहू शकलो नाही, फक्त आग दिसत होती. जुबैर म्हणाला- ‘मी माझा सीट बेल्ट उघडला आणि मला काहीसा प्रकाश दिसला. मी प्रकाशाकडे गेलो. माझा जीव वाचवण्यासाठी मी दहा फूटांवरून उडी घेतली.

त्याचवेळी एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की त्याने पाहिले की विमानाने प्रथम मोबाइल टॉवरला धडक दिली आणि नंतर अनेक घरांना जाऊन धडकले. यासंदर्भात अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलही झाले आहेत. अपघाताच्या अगदी अगोदर वैमानिकाने विमानातील त्रुटींविषयी हवाई वाहतूक नियंत्रणास माहिती दिली होती . पायलट अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की पायलट सज्जाद गुल हा एक ज्येष्ठ पायलट होता आणि त्याला हवाई परिवहनचा प्रदीर्घ अनुभव होता.

न्यूज अनकट प्रतिनिधी

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा