जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्ताननं केलं युद्ध बंदीचं उल्लंघन, सैन्य अधिकारी शहीद

जम्मू-काश्मीर, ६ ऑक्टोंबर २०२०: काश्मीरमधील युद्धबंदीचे उल्लंघन करत नियंत्रण रेषेवर पाकिस्ताननं गोळीबार केला. सोमवारी युद्धबंदीच्या या घटनेत सैन्याच्या एका कनिष्ठ कमिशनर ऑफिसर (जेसीओ) चा मृत्यू झालाय. भारतीय लष्करानंही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिलं.

युद्धबंदीच्या उल्लंघनाची ही घटना राजौरी जिल्ह्यातील नौशेरा सेक्टरमध्ये घडली. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडून नौशेरा सेक्टरमध्ये गोळीबार करण्यात आला. नौशेरा सेक्टरमधील बाबाखोरी भागात पाकिस्तानी गोळीबारात सैन्याचे जेसीओ ठार झाले आहेत.

मात्र, भारतीय सैन्यानंही प्रत्युत्तर दिलंय. विशेष म्हणजे, युद्धबंदीचा उल्लंघनाची ही घटना त्या दिवशी घडली ज्या दिवशी दहशतवाद्यांनी केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या पथकावर हल्ला केला होता. पुलवामा जिल्ह्यातील पामपोरमधील कांदळ भागात दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या गस्तीवर हल्ला केला.

या घटनेतही सीआरपीएफचे दोन जवान शहीद झाले. तीन सैनिकही जखमी झाले आहेत. जखमी सैनिकांवर उपचार सुरू आहेत. नियंत्रण रेषेवरील युद्धविराम उल्लंघनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. ऑगस्टच्या शेवटी आणि गेल्या महिन्यात म्हणजे सप्टेंबरच्या सुरूवातीला पाकिस्ताननं केलेल्या गोळीबारात जेसीओ रँकचे दोन अधिकारी शहीद झालेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा