पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग यांच्यात आज सामना, ‘करो या मरो’ ची परिस्थिती

नवी दिल्ली, २ सप्टेंबर २०२२:आशिया चषक २०२२ चा ६ वा सामना पाकिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात आज शारजाह क्रिकेत स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. करो किंवा मरोचा हा दोन्ही संघांसाठी सामना आहे. शारजाहवर जिंकणारा संघ भारत, अफगाणिस्तान आणि श्रीलंका सुपर- ४ मध्ये स्थान मिळवेल. पाकिस्तान आणि हाँगकाँग आतापर्यंत १-१ सामने झाले असून दोन्ही संघांना भारताकडून पराभव पत्करावा लागला आहे. भारताने पाकिस्तानचा ५ विकेटने पराभव केला तर हाँगकाँगचा ४० धावांनी पराभव झाला.

आज (शुक्रवार, २ सप्टेंबर) पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया चषक सामना शारजा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाईल. हा सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ७:३० वाजता सुरू होईल, तर या सामन्याचा नाणेफेक संध्याकाळी ७ वाजता होईल. स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाकिस्तान विरुद्ध हाँगकाँग आशिया कप २०२२ मधील ६ वा सामना थेट पाहू शकता.

न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा