पुणे २४ सप्टेंबर २०२२: पुण्यामध्ये पाकिस्तान जिंदाबादचे नारे दिले गेल्याचा संतापजनक प्रकार उघडकीस आला आहे. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाविरोधात ईडी आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी करून व काही लोकांना ताब्यात घेतले. त्याविरोधात पुण्यात काही अल्पसंख्यांक समुदायाच्या लोकांनी शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. या आंदोलना दरम्यान ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पीएफआय विरुद्ध राष्ट्रीय तपास संस्था आणि अंमलबजावणी संचालनालयाने ऑपरेशन ऑक्टोपस अंतर्गत कारवाई केली. २२ सप्टेंबर रोजी या कारवाईचा एक भाग म्हणून, NIA, ED आणि राज्य पोलिसांच्या संयुक्त पथकाने ११ राज्यांमध्ये छापे टाकले आणि १०६ हून अधिक पीएफआय सदस्यांना अटक करण्यात आली.
पीएफआयविरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचं नियोजन या आंदोलकांनी केलं होतं. मात्र या आंदोलनाच्या सुरुवातीला पाकिस्तान जिंदाबादचे नारे द्यायला सुरुवात झाल्याने पुणे पोलिसांनी सतर्कता दाखवून, अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं.
ज्या देशात राहायचे त्याच देशाशी गद्दारी करण्याचे प्रकार आपल्या देशात सर्रास घडतात. काही सेक्युलर मंडळी अशा देशद्रोह्यांना नेहमीच पाठीशी घालत असतात. हल्ली देशात परदेशी गुंतवणूक येऊ नये व गुंतवणूकच्या दृष्टीने भारत अस्थिर असल्याने चित्र जागतिक पटलावर उमटावे यासाठी भडकाऊ आंदोलनाचा वापर केला जातो. संविधानिक मार्गाच्या आंदोलनाला कोणाचीही हरकत नाही, परंतु देशात राहून शत्रू राष्ट्राचा जयजयकार करणाऱ्यांचे पाकिस्तान जिंदाबादचे नारे संतापजनक आणि निंदनीय आहेत. अशा वेळी एनआरसी आणि सीएए कायद्याचे महत्व अधोरेखित होते.
न्यूज अनकट प्रतिनिधी: सुरज गायकवाड