गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय पाकिस्तानकडून भारताला युद्धाची धमकी

पाकिस्तानकडून भारताला युद्धाची धमकी

नवी दिल्ली: पाकिस्तानचे वाचाळवीर रेल्वेमंत्री शेख रशीद यांनी पुन्हा भारताला युद्धाची धमकी दिली आहे.
नागरिकत्व कायदा मंजूर झाल्यांनतर पाकिस्ताने भारताविरुद्ध प्रसिद्धिपत्रक काढून कायद्यांचा निषेद नोंदवला आहे.
रेल्वेमंत्री शेख रशीद म्हणाले की, काश्मीर आणि भारतातील मुस्लिम आमची जबाबदारी आहे. पाकिस्तानच्या नागरिकांनी भारतील मुस्लिमांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहायला हवे.
शेख यांनी पंतप्रधान मोदी यांची तुलना मुसोलिनी हिटलरशी केली आहे. मोदी भारतीय मुस्लिमांच्या अडचणीत वाढ करीत असल्याचा आरोप त्यांनी केला.
भारत पाक मधील तणाव असाच वाढत राहिला तर, दोन्ही देशामध्ये युद्धाची शक्यता नाकारता येणार आणि अशी धमकी त्यांनी भारताला दिली.

error: Content is protected !!
Exit mobile version