पाकिस्तानमधील नानकाना साहिब गुरुद्वारावर दगडफेक

पाकिस्तान: पाकिस्तानच्या नानकाना साहिब येथे दगडफेक केल्याचा प्रकार समोर आला आहे. शनिवारी येथील जनतेने नानकाना साहिब गुरुद्वारा येथे दगडफेक केली. यावेळी आंदोलकांनी गुरुद्वाराला वेढा घातला व दगडफेक सुरू केली. या निदर्शनाचे नेतृत्व मोहम्मद हसन यांच्या कुटुंबीयांनी केले. ज्याने कथितपणे शीख मुलीचे जगजित कौर यांचे अपहरण करून लग्न केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले की ते येथे गुरुद्वाराच्या उपस्थितीच्या विरोधात आहेत.

ननकाना साहिब चे गुलाम-ए-मुस्तफा असे लवकरच या जागेचे नाव देणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले. ननकाना येथे कोणताही शिख राहणार नाही, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून कारवाई केली आणि अनेक दगडफेक करणार्‍यांना अटक केली. दगडफेकीच्या वेळी अनेक लोक गुरुद्वारामध्येच अडकले.

काय प्रकरण आहे?

नानकाना साहिब गुरुद्वारामध्ये ग्रंथीचा आरोप आहे की, त्यांची मुलगी जगजित कौर हिला बंदुकीच्या धाकावर काही लोकांनी पळवून नेले आणि जबरदस्तीने लग्न केले. एक व्हिडिओ देखील समोर आला आहे. व्हिडिओमध्ये मुलीने असा दावा केला आहे की तिने स्वतःच स्वत: च्या इच्छेनुसार धर्मांतर केले आणि हसनशी लग्न केले.

ही बाब उघडकीस आल्यापासून शीख समाजातील लोक संतप्त आहेत. त्याचबरोबर हा मुद्दा अश्या वेळेस उपस्थित झाला आहे जेव्हा शनिवारी लाहोरमध्ये तीन दिवसीय आंतरराष्ट्रीय शीख परिषद आयोजित केली जात आहे.

नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याचा भारताने तीव्र निषेध करतो

त्याचबरोबर पाकिस्तान मधील नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ल्याची तसेच तोडफोडीचा भारताने तीव्र निषेध केला आहे. तसेच शीख समुदायाचे रक्षण करण्यासाठी पाकिस्तानला लवकरात लवकर पावले उचलण्यास सांगितले गेले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करत म्हटले आहे की, ‘नानकाना साहिब गुरुद्वारावरील हल्ला आणि तोडफोडीच्या घटनेमुळे आम्ही चिंताग्रस्त आहोत. नानकाना साहिब शहरात अल्पसंख्याक शीख समुदायामधील लोकांवर हिंसाचार करण्यात आला आहे. शुक्रवारी नानकाना साहिब गुरुद्वारावर झालेल्या हल्ल्यानंतर ऑगस्टमध्ये शीख मुलगी जगजित कौर यांचे अपहरण आणि सक्तीने धर्मांतर केल्याची घटना घडली.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा