पाकिस्तानात अन्नपदार्थांचे दर गगनाला ; टोमॅटो ४०० रुपये किलो

इस्लामाबाद : पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालल्याचे आता सर्वानाच माहीत होतं आहे. एकिकडे पाकिस्तानची आर्थिक स्थिती बिकट होत असताना तेथे महागाईने देखील तेथील जनतेच्या नाकीनाऊ आणले आहेत. पाकिस्तानात सध्या दैनंदिन अन्नपदार्थांचे दर गगनाला भिडले असल्याचे पहायला मिळत आहे.
पाकिस्तानमध्ये सध्या मूगडाळ ही २२० ते २६० रुपये, कडधान्य १६० रुपये प्रती किलो, साखर ७५ रुपये प्रती किलो पर्यंत पोहोचले आहेत. तर टोमॅटोचे दर ४२५ रुपये प्रती किलोपर्यंत पोहोचले आहेत.
पाकिस्तानचा महागाईचा दर १२.७ टक्क्यांवर येऊन पोहोचला आहे. गेल्या नऊ वर्षातील हा सर्वाधिक दर आहे.

जम्मू कश्मीरमधून कलम ३७० हटविल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचे सर्व सामान खरेदीवर रोख लावली आहे. भारतातून मोठ्या प्रमाणात टोमॅटो पाकिस्तान आयात करायचा. त्यामुळे ऑगस्ट महिन्यापासून पाकिस्तानात टोमॅटोची टंचाई भासत आहे. त्यामुळे दर ४०० रुपये प्रती किलो पर्यंत पोहोचले आहेत.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा