पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ यांना मृत्युदंडाची शिक्षा

नवी दिल्ली : पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. पाकिस्तानातील विशेष कोर्टाने माजी लष्करप्रमुख आणि माजी राष्ट्रपती असलेल्या परवेझ मुशर्रफ यांना मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली आहे. परवेझ मुशर्रफ यांच्यावर राष्ट्रद्रोहाचा आरोप ठेवण्यात आला आहे.
परवेज मुशर्रफ सध्या संयुक्त अरब अमिरातीतील दुबई इथे रहात आहेत. मुशर्रफ यांच्याविरोधातील राष्ट्रद्रोहाचा हा खटला २०१३ पासून रखडला होता. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाजच्या (पीएमएल-एन) मागील सरकारने २०१३ मध्ये मुशर्रफ यांच्याविरोधात राष्ट्रद्रोहाचा खटला दाखल केला होता.
मुशर्रफ यांच्यावर ३ नोव्हेंबर २००७रोजी आणीबाणी लागू केल्याचाही आरोप आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा