गुजरात, २४ मे २०२३: हाजी सलीम हा पाकिस्तानचा ड्रग्ज तस्कर आहे. त्याचे मोठे रॅकेट आहे. तो अनेक देशांमध्ये अंमली पदार्थांचा व्यवसाय करतो. याबाबत आता एनआयएने हाजी सलीमवर चौकशी करण्यास सुरुवात केली आहे. भारत सरकार अंमली पदार्थांवर कठोर कारवाई करत आहे. भारताला अंमली पदार्थांपासून मुक्त करायचे आहे, असेही गृहमंत्री अमित शहा म्हणाले होते. यासाठी सर्वांनी मिळून काम करण्याची गरज आहे. एनडीपीएएस कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याबाबत ते बोलले होते.
पाकिस्तानात बसून इतर देशांना ड्रग्जचा काळा व्यवसाय करणारा हाजी सलीम आता एनआयएच्या रडारवर आहे. याबाबत चौकशी सुरू झाली आहे. एनआयए ने गुजरातमध्ये हाजी सलीमच्या नावावर ४० कोटी रुपयांच्या ड्रग्जच्या खेपावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या दीड वर्षात हाजी सलीमच्या नावाने भारतात आलेले सुमारे ४० हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज एनआयएने जप्त केले आहेत.
हाजी सलीम हा पाकिस्तानातील बलुचिस्तानचा रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचे डॉसियर आजपर्यंत कोणत्याही देशाकडे उपलब्ध नाही. कोट्यवधी रुपयांची ड्रग्जची खेप वेगवेगळ्या कोडद्वारे समुद्रमार्गे भारतात येते. या मालासह एनसीबी आणि गुजरात पोलिसांनी १० पाकिस्तानी नागरिकांना शस्त्रांसह अटक केली. अटक करण्यात आलेले सर्व आरोपी बलुचिस्तानचे रहिवासी आहेत. त्यावर आता एनआयएने कारवाई सुरू केली आहे.
‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : सूरज गायकवाड