गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय ‘पाकिस्तान ला एक थेंबही पाणी सोडणार नाही’: गजेंद्रसिंह शेखावत

‘पाकिस्तान ला एक थेंबही पाणी सोडणार नाही’: गजेंद्रसिंह शेखावत

नवी दिल्ली: भारताकडून पाकिस्तानकडे जाणार्‍या नद्यांचे पाणी थांबविण्याच्या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. पाकिस्तानला दिले जाणारे पाणी बंद करण्याची भारत तयारी करत आहे. केंद्रीय जल उर्जा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी बुधवारी सांगितले की, रवि नदीवर बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्याच्या प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाणार नाही आणि ते पाणी भारतामध्ये वापरले जाईल.

बुधवारी केंद्रीय मंत्र्यांनी रावी नदीवर सुरू असलेल्या प्रकल्पाला भेट दिली. गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले की, बैराज प्रकल्प तयार झाल्यामुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांना पाण्याचा पूर्ण वाटा मिळेल. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी रणजित सागर धरणाच्या अधिकाऱ्यानसमवेत बैठक घेऊन घटनास्थळाची पाहणी केली. ते म्हणाले की बैराज चे काम प्रगतीपथावर असून २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होईल अशी आम्हाला आशा आहे. बैराज बांधण्यात केंद्र सरकारकडून निधीची कमतरता भासणार नाही.

केंद्रीय मंत्री म्हणाले की धरणातून सुटलेले पाणी सीमावर्ती भागात दिले जाईल, ज्यामुळे १०० हून अधिक गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. ते म्हणाले की या प्रकल्पांसाठी केंद्र सरकार ८६ टक्के निधी देईल. जम्मू-काश्मीरलाही मोठा फायदा होईल. गजेंद्रसिंग शेखावत म्हणाले की, जम्मू-काश्मीरच्या वाटासाठी केंद्र सरकारही निधी पुरवेल आणि पंजाब सरकार बैराजच्या १४ टक्के खर्च देईल. एसवायएलच्या मुद्दय़ावर ते म्हणाले की ही बाब सर्वोच्च न्यायालयात असून सर्वांना कोर्टाचा निर्णय मान्य करावा लागेल.

error: Content is protected !!
Exit mobile version