गोल पोस्ट आंतरराष्ट्रीय पाकिस्तानने नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द सुरू करण्यास नकार दिला

पाकिस्तानने नरेंद्र मोदींसाठी हवाई हद्द सुरू करण्यास नकार दिला

इस्लामाबाद (पीटीआय): आंतरराष्ट्रीय सिमे प्रमाणे हवेमध्ये ही पाकिस्तानच्या भारतविरोधी कारवाया सुरू आहे. पाकिस्तानने पुन्हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रस्तावित सौदी अरेबिया दौर्‍यासाठी आपली वायु हद्द सुरु करण्यास नकार दिला आहे. भारताने ही हद्द खुली केली जावी असा विनंती केली होती परंतु पाकिस्तानच्या सैन्याने ती उद्धटपणे फेटाळून लावली. कश्मीर मधील मानवी हक्कांचा मुद्दा उपस्थित करीत पाकिस्तान्याने पुन्हा हे कृत्य केले आहे. पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शहा मेहमूद कुरेशी यांनी या संदर्भात एक सविस्तर निवेदन प्रसिद्ध केले असल्याचे तेथील नभोवाणी केंद्रावरून जाहीर करण्यात आले.

error: Content is protected !!
Exit mobile version