पाकिस्तानची फजिती सुरूच, न्यूझीलंडनंतर इंग्लंडकडूनही दौरा रद्द

पुणे, 21 सप्टेंबर 2021: पाकिस्तान क्रिकेटला आणखी एक झटका बसला आहे. न्यूझीलंड पाठोपाठ आता इंग्लंडनंही आपला पाकिस्तान दौरा रद्द केला आहे. आतापर्यंत दहशतवाद्यांना पाठिंबा देणं पाकिस्तानच्या चांगलंच अंगलट आहे. काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानच्या दौऱ्यावर आलेल्या न्यूझीलंडने सामना सुरु होण्यासाठी 20 मिनीटं शिल्लक असताना दौरा रद्द केला होता. त्यानंतर आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाने देखील पाकिस्तानचा दौरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. न्यूझीलंडने सुरक्षेची कारणं देत दौरा रद्द केला होता. त्यानंतर इंग्लंड क्रिकेटनेही हा निर्णय घेतला आहे.
इंग्लंड पुरूष आणि महिला संघ पाकिस्तानचा दौरा करणार होते. इंग्लंडचा संघ 16 वर्षानंतर पाकिस्तान दौरा करण्यास तयार झाला होता. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडने दौरा रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट  ऑक्टोबरमध्ये दोन टी-20 सामने खेळण्याकरता पाकिस्तानमध्ये येणार होती. 13 आणि 14 ऑक्टोबर रोजी हे सामने खेळवले जाणार होते. इंग्लंडची महिला क्रिकेट टीमही यावेळी दोन टी20 आणि तीन वनडे सामने खेळण्यासाठी येणाकर होती. पण या दोन्ही संघाचे हे आगामी दौरे रद्द झाल्यांच नुकतचं समोर आलं आहे. इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाकडून नुकतीच ट्विटरवर एक पोस्ट करत ही माहिती देण्यात आली आहे.
“इंग्लंडने पाकिस्तान दौरा रद्द करण्याचं निश्चित केलं आहे. त्यामुळे पुरुष आणि महिला क्रिकेट संघाचा ऑक्टोबरमध्ये होणारा पाकिस्तान दौरा रद्द करण्यात आला आहे.”, असं ट्वीट इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केलं आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटलं आहे की, ‘आमच्यासाठी खेळाडूं आणि सपोर्ट स्टाफचं मानसिक आणि शाररिक आरोग्य सर्वात महत्त्वाचं आहे. सध्याची परिस्थिती पाहता कोणत्याही प्रकारचा प्रवास धोक्याचाच आहे. त्यात त्या भागात दौऱ्यासाठी जाण्याने खेळाडूंवर ताण वाढेल. त्यात कोरोनासंबधी नियम आणि एकदरीत तणावामुले आगामी टी-20 विश्वचषकासाठी आमच्या टी-20 संघावरही याचा परिणाम होईल. या सर्वामुळे आम्ही हा निर्णय़ घेत आहोत.’
न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा