पाकिस्तानचे ग्रे लिस्ट मधील स्थान कायम

इस्लामाबाद, २४ ऑक्टोबर २०२०: पाकिस्तान कडून दहशतवादी आणि आतंकवादी संघटना सातत्याने निधी पुरवण्यात आला आहे. इतकेच काय तर जगातील अनेक मुख्य आतंकवादी संघटना देखील पाकिस्तान मध्ये बघण्यास मिळतात. दरम्यान, फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्स (एफएटीएफ) च्या बैठकीत पाकिस्तानला ग्रे लिस्टमध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. एफएटीएफच्या कृती योजनेतील सर्व २७ पॅरामीटर्सचे पालन करण्यात पाकिस्तान अपयशी ठरला त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.

वास्तविक, पाकिस्तान एफएटीएफच्या करड्या यादीतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, यात पाकिस्तानला यश आलेले नाही. दहशतवाद्यांना आश्रय देण्याचा पाकिस्तानवर सातत्याने आरोप होत आहे. त्याच वेळी ते एफएटीएफचे निकष पूर्ण करण्यात अपयशी ठरले आहे. त्यानंतर पुन्हा एकदा पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पाकिस्तानचा बचाव करण्यासाठी तूर्किने असा प्रस्ताव मांडला की, २७ पैकी उर्वरित सहा निकषांची प्रतीक्षा करण्याऐवजी सदस्यांनी पाकिस्तानच्या चांगल्या कार्याचा विचार केला पाहिजे. तसेच, त्याचे मूल्यांकन अंतिम करण्यासाठी एफएटीएफच्या साइटने पाकिस्तानला भेट दिली पाहिजे.

त्याच वेळी, जेव्हा ३८-सदस्यांच्या पूर्ण बैठकीत प्रस्ताव ठेवला गेला, तेव्हा कोणत्याही सदस्याने त्या प्रस्तावाला मान्यता दिली नाही. चीन, मलेशिया किंवा सौदी अरेबियानेसुद्धा हे मान्य केले नाही. आता एफएटीएफने पुढील वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात पुढील आढाव्यापर्यंत पाकिस्तानला ग्रे लिस्ट मध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा