पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांचा फोन नंबर देखील पेगाससच्या हेरगिरीच्या यादीत, भारतावर आरोप

नवी दिल्ली, २१ जुलै २०२१: इस्त्रायली स्पायवेअर पेगाससच्या हेरगिरीच्या मुद्दय़ावरून संसद ते गल्लीपर्यंत देशात गदारोळ निर्माण झाला आहे, तर आता पाकिस्तानमध्येही हा मुद्दा जोर धरत आहे. अमेरिकन वृत्तपत्र वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालात असा दावा केला गेला आहे की, हेरगिरी करण्यात आलेल्या नंबर पैकी एक फोन नंबर असाही आहे ज्याचा वापर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केला होता.

हा अहवाल समोर आल्यानंतर पाकिस्तानच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पाकिस्तानी मीडिया डॉन न्यूजनुसार पाकिस्तानचे आयटी मंत्री फवाद चौधरी यांनी आंतरराष्ट्रीय मंचांमध्ये पाक पंतप्रधानांच्या हेरगिरीचा मुद्दा उपस्थित करण्याची धमकी दिली आहे. चौधरी यांनी भारतावर हेरगिरीचा आरोप केला आहे. या प्रकरणाची माहिती समोर येताच हा मुद्दा उपस्थित केला जाईल, असे त्यांनी म्हटले आहे.

या हेरगिरीच्या यादीत भारतातील १,००० फोन नंबर

वॉशिंग्टन पोस्टच्या अहवालानुसार, भारतातील एक हजार आणि पाकमधील १०० फोन नंबर या पाळत ठेवण्याच्या यादीमध्ये ठेवण्यात आले होते. पेगासस स्पायवेअर सॉफ्टवेअर इस्त्रायली फर्म एनएसओ ग्रुप टेक्नोलॉजीजने विकसित केले आहे. कंपनी हॅकिंग सॉफ्टवेअर बनविण्यात माहिर आहे. त्यांचा दावा आहे की बर्‍याच देशांच्या सरकारांनी हेरगिरीसाठी त्याचे सॉफ्टवेअर वापरले आहे.

अहवालातील दावे – मोदींचे मंत्रीही हॅकिंगच्या अधीन आहेत

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, केवळ कॉंग्रेसचे नेतेच नाही तर संसदेत सरकारचे रक्षण करणारे केंद्रीय संस्कृतीमंत्री प्रह्लाद पटेल आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांचेही फोन हॅकिंगच्या निशाण्यावर होते. अहवालात नमूद केलेल्या नावांपैकी ही प्रमुख नावे आहेत.

१. या यादीमध्ये विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांचे दूरध्वनी क्रमांकही समाविष्ट करण्यात आले.

२. संसदेत सरकारचा बचाव करणारे आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांचेही नाव या यादीमध्ये समाविष्ट झाले.

३. निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांचे नावदेखील या यादीमध्ये नमूद केले आहे. २०१४ मध्ये प्रशांत किशोर यांनी मोदींची ब्रॅण्डिंग केली होती.

४. माजी निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे नावही या यादीत समाविष्ट आहे. २००९ च्या निवडणुकीत मोदी-शाह यांच्याविरोधातील तक्रारीवरील निवडणूक आयोगाच्या निर्णयाशी लवासा यांनी एकमत नव्हते.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा