पाकिस्तानात सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत,चाहत्यांनी व्हीआयपी विभागाच्या भिंतीवर चढून केला राडा..!

24

Security Champions Trophy 2025 : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला सुरू होण्यासाठी अवघे काहीच दिवस राहिले आहेत. परंतु पाकिस्तानचा सुरक्षेचा मुद्दा काही कमी होण्याच नाव घेत नाहीये. यंदाच्या चॅम्पियन्स ट्रॉफीच यजमानपद पाकिस्तान भूषविणार असून लाहोर, कराची आणि रावळपिंडी अशा तीन शहरांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवले जाणार आहे. तर भारतीय संघाचे सामने सर्व सामने सुरक्षेच्या कारणावरून दुबईला खेळवण्यात येणार आहेत. येत्या १९ फेब्रुवारीला पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात पहिला सामना रंगणार आहे. त्याचबरोबर भारत आणि बांग्लादेश यांच्यात २० फेब्रुवारीला सामना खेळण्यात येणार आहे. पण आता चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने सुरू होण्याआधीच सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात पुन्हा एकदा पाकिस्तानात सुरक्षेचा प्रश्न उपस्थित झाल्याचे दिसून येत आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून त्यांच्या लाहोरमधील गद्दाफी स्टेडियमचे उद्घाटन करण्यात आले असून ज्या स्टेडियमवर येणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचे सामने खेळवन्यात येणार आहेत. पीबीसीने आयसीसीला चॅम्पियन्स ट्रॉफी दारम्यान पाकिस्तानमध्ये खेळणाऱ्या संघाना सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. पण ते आश्वासन सामने सुरू होण्याआधीच त्यांच्याकडून मोडले असल्याची माहिती समोर येत आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यात चाहते स्टेडियमच्या व्हीआयपी विभगाच्या भिंतीवर चढून राडा करताना दिसत आहेत. हा नेमका प्रकार कशामुळे घडला व अद्याप याबबात अधिकृत माहिती सांगण्यात आलेली नाही. व्हायरल होणाऱ्या व्हिडिओची न्यूज अनकट पुष्टी करत नाही.

सुरक्षेच्या मुद्यावरून कारण देत भारतीय क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाचे सामने पाकिस्तानात खेळवण्यासाठी नकार दिला होता. मात्र या व्हिडिओवर अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रियान आलेली नाही.

न्यूज अनकट प्रतीनिधी : प्रथमेश पाटणकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा