मुंबई: महाराष्ट्रातील पालघरच्या घटनेने राजकीय वळण घेतले आहे. अशा परिस्थितीत शरद पवार यांनी आज उद्धव ठाकरे यांच्यासाठी राजकीय बोलणे केले. पण भाजप सतत यावरून राजकारण करत आहे. उमा भारती यांनी उद्धव यांना राज्य सरकारवर प्रश्न विचारत एक पत्र लिहिले आहे, तर संघदेखील या याचा मागोवा घेण्याची मागणी करत आहे. ही घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. पालघरमध्ये दोन साधूंसह तीन जणांच्या हत्येमुळे महाराष्ट्र ते दिल्ली अशी खळबळ उडाली, आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी या धक्कादायक घटनेवर मौन तोडले आहे. शरद पवार यांनी घटनेचा निषेध केला पण उद्धव सरकारची पाठ थोपटणे विसरले नाही.
पालघर प्रकरणी राज्य सरकारवर होणाऱ्या टीकेवर बोलताना शरद पवार म्हणाले की, ‘पालघर प्रकरण आणि कोरोनाचा काहीही संबंध नाही. त्यामुळे पालघरच्या घटनेचं राजकारण करू नका. पालघरमध्ये जी घटना घडली त्याचा संबंध असेल त्यासंदर्भात चौकशी करण्याचे आदेश राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. या प्रकरणातील काही लोकांना अटक करण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर अवघ्या काही तासांतच राज्य सरकार आणि पोलीस प्रशासनानं याची दखल घेतली आहे. अशी प्रकरणं घडायला नकोत, हे कृत्य निषेधार्ह आहे.’
यावेळी शरद पवार म्हणाले की, काही तासात राज्य सरकारने खबरदारी घेत पालघर प्रकरणात १०० पेक्षा जास्त लोकांना अटक केली, जे घडलं ते चांगल नाही पण या प्रकारातून राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळली अशाप्रकारे वातावरण तयार केले जातं पण आज राजकारण करण्याची वेळ नाही. कोरोनाशी एकजुटीने मुकाबला करण्याची गरज आहे. या संकटाशी लढण्याची जबाबदारी सर्वांवर आहे अशा शब्दात त्यांनी नाव न घेता भाजपा नेत्यांना टोला लगावला आहे.