पालखी सोहळ्यात घुसला जेसीबी ; दोन वारकरी ठार

पुणे : कार्तिकी वारीसाठी पंढरपुरहून आळंदीकडे निघालेल्या पालखी सोहळ्यात जेसिबी (JCB) मशीन घुसल्याने दिवे घाटात मोठा अपघात झाला आहे. जेसिबीने चिरडल्याने दोन वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये नामदेव महाराजांचे वंशजांचा समावेश आहे. तसेच या अपघातात १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे- सासवड मार्गावरील दिवे घाटात मंगळवारी सकाळी हा अपघात झाला. जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती रामभाऊ चोपदार यांनी दिली आहे.

मिळालेली माहिती अशी की, सोपान तुळसीदास नामदास (नामदेव महाराजांचे वंशज) आणि अतुल हाडशी (खेड) यांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. हडपसर येथील नोबल हाॅस्पिटलमध्ये जखमींना दाखल करण्यात आले असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे.
दिवे घाटात वारकरी दिंडीला अपघात झाल्याची घटना मंगळवारी(आज) सकाळी घडली. या घटनेत दोन जणांचा मृत्यू झाला आहेत. तर १५ जण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत संत नामदेव महाराज यांचे १७ वे वंशज सोपान महाराज नामदास आणि अतुल महाराज आळशी यांचे निधन झाले आहे.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा