पुणे ,९ नोव्हेंबर २०२२ : बाहुबली पॅन इंडिया सुपरस्टार प्रभासच्या आगामी आदिपुरुष या चित्रपटाचे प्रेक्षक गेले अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करत आहेत. या सिनेमाचा टिझर आउट झाल्यापासून हा सिनेमा वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. त्याचबरोबर सोशल मीडियावरही त्याला खूप ट्रोल करण्यात आलं होतं.
टीझर मधील रावणाची भूमिका आणि लुक पाहून नेटकरी चांगलेच भडकले होते काहींनी तर हा टिझर म्हणजे एखाद्या कार्टून फिल्म पाहिल्यासारखा वाटतंय असं हि म्हटले होतं. त्यामुळेच चित्रपटाचे निर्माते भूषण कुमार यांनी टीमला सर्व दृश्यांवर पुन्हा काम करण्यास सांगितले आहे.
हा चित्रपट १२ जानेवारी २०२३ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार होता. पण चित्रपटाच्या टीम ने व्हीएफएक्सवर आणखी मेहनत घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हा सिनेमा आता १६ जून २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे.
दरम्यान आदिपुरुष हा आतापर्यंतचा सर्वात महागडा हिंदी चित्रपट ठरणार आहे. त्याचं बजेट ६०० कोटी रुपये आहे. तर या सिनेमात प्रभास, सैफ अली खान, क्रिती सेननं, सनि सिंह, हे कलाकार दिसणार आहेत. हा सिनेमा १६ जून २०२३ ला एकच वेळी हिंदी ,तेलगू ,तामिळ,मलयाळम, आणि कन्नड भाषेमध्ये रिलीज होणार आहे. या चित्रपटाची निर्मिती भूषण कुमार, प्रसाद सुतार, व राजेश नायर यांनी केली आहे.
न्यूज अनकट प्रतिनिधी – अंकुश जाधव













































