पणजी न्यायालयातील चोरी उघड; वकीलच निघाला चोर

गोवा, ३ फेब्रुवारी २०२३ : पणजी आल्लीनो येथील जिल्हा सत्र न्यायालयामध्ये जी चोरीची घटना घडली होती त्या प्रकरणी पोलिसांनी मुस्लिम वाडा वाळपयी येथील वकील मुजाहिद्दीन शेख याला अटक केली आहे. याबाबत पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांनी रात्री माहिती दिली. यावेळी उपअधीक्षक सुदेश नाईक निरीक्षक निखिल पालेकर व पोलिस पथक उपस्थित होते.

सदर चोरटा संशयित वकील पणजीत काम करीत नसतानाही कामकाजाच्या वेळी न्यायालयात घुसला होता व न्यायालय बंद झाल्यानंतर आतमध्येच लपून राहिला व त्यानंतर त्याने तीन तासांत सुमारे दीड लाखाचे दागिने व काही रोख रक्कम आणि कागदपत्रे पळविली होती.

खुद्द न्यायालयातच चोरी झाल्यामुळे पोलिसांची झोप उडाली होती. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला असता, चोरटा वकील निघाला. आज पहाटे त्याला अटक करण्यात आली आहे‌. उत्तर गोवा पोलिस अधीक्षक निधीन वालसन यांच्या मार्गदर्शनाखाली पणजी पोलिस स्थानकाचे पोलिस निरीक्षक निखिल पालेकर यांनी व पोलिस पथकाने ही कारवाई केली आहे.

‘न्यूज अनकट’ प्रतिनिधी : अमोल बारवकर

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा