कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीने ओलांडली धोक्याची पातळी

कोल्हापूर, ऑगस्ट २०२२: राज्यात पावसाचा जोर वाढला असून धरण क्षेत्रात पाऊस सुरु आहे. कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसा पासून मुसळधार पाऊस सुरु आहे. पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु असून पंचगंगा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे. पावसाचा जोर कायम असून धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी विसर्ग सुरू आहे. राधानगरी धरणाचा एक दरवाजा पहाटे साडेपाचला उघटला असून दुसरा सकाळी नऊ वाजता उघडला आहे.

राधानगरी धरणाचे दोन दरवाजे उघडले असून पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीच्या धोक्याची पातळी ३९ फुट असून सध्या पाण्याची पातळी ४० फुटावर आहे. ती ४३ फुट या पातळीच्या दिशेने वाढत आहे.

कोल्हापूर शहराच्या प्रशासनाने नदीची धोका पाणी पातळी ओलांडण्याची शक्यता धरुन नदीकाठच्या भागातील लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. याबाबत नदी काठच्या गावांना व ग्रामस्थांना सूचना दिल्या आहेत.

न्युज अनकट प्रतिनिधी : विजय सपकाळ

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा