पाणी बचतीत इजराइल महाशक्ती

34

तेल अविव: इजराइल या देशावर पाण्याचे संकट हे वर्षानुवर्षे राहिले आहे. परंतु भयानक पाणीटंचाई नंतरही येथील कृषी व्यवस्था भारता पेक्षाही चांगली असल्याचे दिसून येते. इजराइल मध्ये ८० टक्के सांडपाण्याचा वापर पुन्हा करण्यात येतो. पाणी संवर्धनाच्या बाबतीत इजराइल हे जगामध्ये सर्वोच्च स्थानावर मानले जाते. पाणी फेरवापर आणि काटकसरीने वापरणे या तंत्रज्ञानात इजराइलने मोठ्याप्रमाणावर महारत हस्तगत केली आहे.
जागतिक पाण्याचे स्त्रोत घटत असताना पाणी बचतीसाठी इजराइल हे जगाचे प्रेरणास्थान आहे असे मत केंद्रीय जलसंधारण मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी येथे व्यक्त केले. पाण्याच्या बचतीत इजराइल ही महाशक्ती असल्याची घोषणाही त्यांनी केली. वाळवंटी प्रदेशात असलेल्या इस्राईलने उपलब्ध पाण्याचा पुरेपूर वापर केला आहे. तसेच पाण्याचे स्त्रोतही सुरक्षित ठेवले आहेत. असे सांगून ते म्हणाले की, या देशाच्या तंत्रज्ञानाचा अनुभवाचा वापर जगालाही करता येऊ शकतो. पाणी तंत्रज्ञान आणि पर्यावरण नियंत्रण परिषदेत शेखावत बोलत होते.

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा