नवी दिल्ली: ‘पानीपत’ चित्रपटाचा वाद वाढत आहे. आज संसद भवनही या यावरून वाद झाला. नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल यांनी ‘पानीपत’ चित्रपटाचे पोस्टर फाडले. त्यांनी संसद भवन संकुलात महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर हे ‘पानीपत’ चित्रपटाचे पोस्टर फाडले.
‘पानीपत’ चित्रपटाच्या निषेधार्थ पोस्टर फाडताना नागौरचे खासदार हनुमान बेनीवाल म्हणाले की, चित्रपटावर त्वरित बंदी घालावी. या चित्रपटात भरतपूरच्या महाराजा सूरजमलच्या व्यक्तिरेखेला चुकीच्या पद्धतीने दाखवण्यात आले आहे. बेनीवाल म्हणाले की, या चित्रपटामुळे केवळ जाट समाजच नाही तर देशाच्या भावनाही दुखावल्या आहेत. ते म्हणाले की ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आणि गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील आणि चित्रपटावर बंदी घालण्याची विनंती करतील. खासदार म्हणाले, “कोट्यावधी लोकांच्या भावना लक्षात ठेवून पानीपत चित्रपटावर त्वरित बंदी घालावी”.