दिगदर्शक आशुतोष गोवारीकर यांनी ऐतिहासिक चित्रपट देऊन चित्रपट सृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या त्यांचा “पानिपत” नावाचा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर आहे. त्यात मुख्य भूमिकेत “बाबा” म्हणजे संजय दत्त आहे. त्याने या चित्रपटात अहमद शहा अब्दालीची भूमिका साकारली आहे.
सध्या या चित्रपटातिला संजय दत्ताचा लूक सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. यामध्ये संजय दत्त अहमदशाह अब्दालीची भूमिका साकारणार आहे. त्याचा चिलखत व शिरस्त्राण घातलेला लूक लक्षवेधी आहे. या लूकवरून सदरील भूमिकेची भव्यता लक्षात येते. यामध्ये संजय दत्तची नजरही जरब बसवणारी आणि भयभीत करणारी आहे.
या चित्रपटात अभिनेता अर्जुन कपूर, संजय दत्त आणि अभिनेत्री क्रिती सॅनॉन यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दरम्यान, या चित्रपटाची कथा पानिपतच्या लढ्यावर बेतलेली आहे.