पंजाबच्या शेतकऱ्यांची नांदेडच्या गुरूद्वारासाठी मदत

नांदेड, दि.५जून २०२० : कोरोनाच्या संकटात देखील पंजाबच्या अन्नदाता शेतकऱ्यांनी नांदेडच्या गुरुद्वारा तख्तला सचखंड श्री हजूर साहेबसाठी तब्बल सतरा ट्रक भरून गहू पाठवून मदत केली आहे.

दरवर्षी गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्डाच्या वतीने पंजाबच्या शेतकऱ्यांना, संत, महात्मा आणि भाविकांना लंगरसाठी गहू पाठविण्याचे आवाहन करण्यात येते, परंतु दि.२३ मार्चपासून देशभरात लॉकडाऊन करण्यात आले होते.

दरम्यान, लाॅकडाऊनमध्ये शिथिलता मिळाल्याने पंजाब येथील शेतकरी व भाविकांनी १७ ट्रक गहू, तांदूळ आणि तूप थोड्या प्रमाणात पाठविण्यात आले आहेत. गहूचे ट्रक नांदेडमध्ये दाखल झाले आहेत.
गुरुद्वारा बोर्डाचे अध्यक्ष भूपिंदरसिंघ मिनहास, उपाध्यक्ष गुरिन्दरसिंघ बावा, सचिव रविंदरसिंघ बुंगाई, गुरुद्वारा बोर्डाचे सर्व सदस्य आणि बोर्डाचे अध्यक्ष गुरविंदरसिंघ वाधवा यांनी पंजाबच्या शेतकऱ्यांचे आणि भाविकांचे आभार मानले आहे.

न्युज अनकट प्रतिनिधी:

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा