गोल पोस्ट इतर राजकारण जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडे यांचा...

जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा बांधणार नाही, पंकजा मुंडे यांचा मोठा निर्धार

बीड, १ जुलै २०२३ : भाजप नेत्या पंकजा मुंडे आपल्या वक्तव्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आल्या आहेत. आताही त्यांच्या एका वक्तव्यने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी त्यांनी आपण फेटा बांधणार नाही असे म्हणताना आता ताकही फुकूंन पिण्याची वेळ आल्याचे म्हटले आहे.

त्यांच्या या वक्तव्यामुळे पंकजा मुंडे असे का म्हणाल्या अशीच चर्चा सुरू आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमध्ये आयोजित कार्यकर्मात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन हे वक्तव्य करताना जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत आपण फेटा बांधणार नाही, असा निर्धार केला आहे. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील व्यासपिठावर उपस्थित होते.

यावेळी पंकजा मुंडे यांनी राजेंद्र म्हस्के यांचे नाव घेत त्यांनी मला फेटा बांधा असे म्हणाले. मात्र यावेळी ओबीसी आरक्षणाची आठवण करून देत त्या म्हणाल्या, त्यावेळी मी गळ्यात कोणतीही फुलाची माळ घालणार नाही, असे म्हटले होते. तेंव्हा ओबीसी आरक्षण वाचले आणि लोकांनी गळ्यात हार घातले. पण आता मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे. यावेळी जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत मी फेटा बांधणार नाही, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी : अनिल खळदकर

error: Content is protected !!
Exit mobile version