सामाजिक कार्यातून साहेबांचा वसा आणि वारसा पंकजाताईंनी जपला: अक्षय मुंदडा

बीड, १६ डिसेंबर २०२०: राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाल्यानं लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या जयंतीनिमित्त रक्तदान शिबीर घेण्याचं आवाहन लोकनेत्या पंकजाताई मुंडे तसेच जिल्ह्याच्या खासदार डॉ. प्रितमताई मुंडे यांनी केलं असता या अनुषंगानं केज तालुका भारतीय जनता पार्टी च्या वतीनं केज उपजिल्हा रूग्णालयात रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.

काल मंगळवार दिनांक १५ डिसेंबर रोजी दुपारी ११ वाजता केज तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीनं रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आलं असता साहेबांचा वसा आणि वारसा पंकजाताई मुंडे सक्षमपणे चालवत असल्याचं प्रतिपादन भाजपाचे युवा नेते अक्षय मुंदडा यांनी यावेळी केलं.

आयोजित केलेल्या रक्तदान शिबीराचा शुभारंभ भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या शुभहस्ते तर विडा गटाचे जिल्हा परिषद सदस्य श्री. विजयकांत मुंडे, जि. प. सदस्य योगिनीताई थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

न्यूजअनकट प्रतिनिधी: प्रगती कराड

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा