पंतप्रधान मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक, युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यावर विचारमंथन

रशिया आणि युक्रेन युद्ध, १ मार्च २०२२ : युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक सुरू झाली आहे. परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्यासह इतर नेतेही यात सामील आहेत. बैठकीत युक्रेनमधून भारतीय लोकांना लवकरात लवकर भारतात आणण्यावर चर्चा होत आहे.

केंद्रीय मंत्री हरदीप पुरी, पियुष गोयल, ज्योतिरादित्य सिंधिया, किरण रिजिजू, पीयूष गोयल, जनरल व्हीके सिंग आणि परराष्ट्र सचिवही या बैठकीत उपस्थित आहेत. ऑपरेशन गंगा अंतर्गत केंद्र सरकारकडून ४ मंत्री पाठवले जाणार आहेत.

केंद्र सरकारचे चार मंत्री बचाव मोहिमेअंतर्गत युक्रेनच्या शेजारील देश पोलंड, हंगेरी आणि रोमानिया येथे पोहोचणार आहेत. कारण युक्रेनमधील भारतीय लोकांना या देशांमध्ये रस्त्याने आणले जात आहे. येथून त्यांना विमानाने भारतात आणले जाईल.

जनरल व्ही के सिंग पोलंडच्या राजदूतांची भेट घेणार आहेत


विशेष म्हणजे जनरल व्ही के सिंह काल रात्री पोलंडला रवाना झाले आहेत. जनरल व्ही के सिंह पोलंडचे राजदूत अ‍ॅडम बुराकोव्स्की यांची भेट घेणार आहेत.

युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

पोलंडला रवाना होण्यापूर्वी जनरल व्ही के सिंह यांनी सांगितले होते की, तेथे अडकलेल्या लोकांना सुरक्षित कसे आणता येईल यावर सरकारचे लक्ष आहे. युक्रेनमधील परिस्थिती अत्यंत गंभीर आहे, अशा परिस्थितीत लोकांनी संयम बाळगणे आवश्यक आहे. अशा प्रकारे संकटाचा सामना करता येईल.


न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा