विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्यानं भाजपच्या प्रचारासाठी पीएम मोदी आज महराष्ट्रात येणार आहे.
मोदींची पहिली सभा 13 ऑक्टोबरला उत्तर महाराष्ट्रातील जळगावमध्ये झाली. आज अकोला, परतूर(जालना), पनवेल(नवी मुंबई) या ठिकाणी मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत.
नव्याने भाजपात प्रवेश केलेल्या उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठीही मोदी साताऱ्यात जाणार आहे. दरम्यान साताऱ्यात विधानसभेसह लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.
पंतप्रधान मोदींची शेवटची प्रचार सभा मतदानाच्या दोन दिवस आधी 18 ऑक्टोबरला मुंबईत होणार आहे.