पंतची कमाल, शतक हुकलं, तरीही प्रशिक्षक द्रविडचा मोडला हा विक्रम

Rishabh Pant, Ind Vs Sa, 22 जानेवारी 2022: टीम इंडियाचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शानदार फलंदाजी केली. ऋषभ पंतने कर्णधार केएल राहुलसह विकेटची जबाबदारी सांभाळली आणि 85 धावा केल्या. पंतचं शतक नक्कीच हुकलं, पण या एका खेळीने त्याने अनेक विक्रमही केले.

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या वनडेत ऋषभ पंतने 85 धावा केल्या. ऋषभ पंतने आपल्या डावात 71 चेंडू खेळले, ज्यामध्ये त्यानं 10 चौकार आणि दोन षटकारही मारले. ऋषभ पंतचा स्ट्राईक रेट 119 पेक्षा जास्त होता. ऋषभ पंतने केएल राहुलसोबत 115 धावांची भागीदारी केली.

ऋषभ पंतने प्रशिक्षक द्रविडचा विक्रम मोडला

ऋषभ पंतची वनडे क्रिकेटमधली ही सर्वोच्च धावसंख्या आहे, त्यानं शतक पूर्ण केलं नसंल पण त्यानं एक विक्रम आपल्या नावावर केलाय. ऋषभ पंत एकदिवसीय क्रिकेटमध्ये दक्षिण आफ्रिकेत भारतासाठी सर्वात मोठी खेळी खेळणारा यष्टीरक्षक बनलाय. विशेष म्हणजे ऋषभ पंतने सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असलेल्या राहुल द्रविडचा विक्रम मोडलाय.

SA (ODI) मध्ये भारतीय यष्टीरक्षकाच्या सर्वाधिक धावा

• 85 धावा – ऋषभ पंत विरुद्ध एसए, पार्ल 2022
• 77 धावा – राहुल द्रविड वि एसए, डर्बन 2001
• 65 धावा – एमएस धोनी वि एसए, जोहान्सबर्ग 2013
• 62 धावा – राहुल द्रविड विरुद्ध इंग्लंड, डर्बन 2003

एवढंच नाही तर ऋषभ पंतचे केपटाऊन कसोटीतील शानदार शतक हे भारतीय यष्टीरक्षकाचं दक्षिण आफ्रिकेतील पहिलं शतक होतं.

हे लक्षात घेण्यासारखं आहे की ऋषभ पंतने कसोटी क्रिकेटमध्ये स्वत: ला प्रस्थापित केलं आहे, परंतु पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अद्याप त्याच्या बॅटमधून एकही मोठी खेळी झालेली नाही. मात्र, या डावात ऋषभ पंत आपल्या पूर्ण रंगात दिसला. ऋषभने आतापर्यंत 20 एकदिवसीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याच्या नावावर फक्त 630 धावा आहेत.

न्यूज अनकट प्रतिनिधी: ईश्वर वाघमारे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा