पॅरालिसिसग्रस्त पतीला पत्नीचा दणका; बँकेतून उडवले १.४० कोटी रुपये

37
पॅरालिसिसग्रस्त पतीला पत्नीचा दणका; बँकेतून उडवले १.४० कोटी रुपये
पॅरालिसिसग्रस्त पतीला पत्नीचा दणका; बँकेतून उडवले १.४० कोटी रुपये

Karvenagar Bank Fraud : कर्वेनगरमध्ये एका हृदयद्रावक घटनेत, एका पत्नीने आपल्या पॅरालिसिसग्रस्त पतीच्या बँक खात्यातून तब्बल १ कोटी ४० लाख रुपये काढून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेने पती आणि त्याच्या वृद्ध आईला आर्थिक अडचणीत ढकलले आहे. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात सुनेविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

८४ वर्षीय सासूने दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा ६० वर्षीय मुलगा पॅरालिसिसने त्रस्त असताना, सुनेने त्याच्या आजारपणाचा गैरफायदा घेतला. एप्रिल २०२४ मध्ये मुलाला पॅरालिसिसचा झटका आल्यानंतर, पत्नीने रुग्णालयात भेट दिली. मात्र, त्यानंतर तिने मुलाच्या बँक खात्यातून टप्प्याटप्प्याने १.४० कोटी रुपये काढले.

पैसे काढल्यामुळे बँक खाते रिकामे झाले असून, कुटुंबाला उपचारासाठी आणि दैनंदिन गरजा भागवण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागत आहे. सुनेने पतीचा मोबाईलही काढून घेतल्याचा आरोप सासूने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून, फसवणूक करणाऱ्या सुनेवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

न्यूज अनकट प्रतिनिधी सोनाली तांबे

कृपया आपले प्रतिक्रिया कळवावी

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा